सीली बॉय, राहुलको धोपटेंगे ना; भाजपचा ट्विटर वार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : नितीन गडकरींवरून भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या राहुल गांधींवर भाजपने ट्विटरवरून खास गली बॉयच्या शैलीत निशाणा साधला आहे. गली बॉय चित्रपटाचा आधार घेत राहुल गांधींची खिल्ली या पोस्टरमधून उडवण्यात आली आहे. सच्चाई के साथ गुलु-गुलु करेंगा तो धोपटेंगे ना इसको, असा निशाणा राहुल गांधींवर साधण्यात आला आहे. यापुढे हॅशटॅग सिली बॉय असेही लिहीले आहे.

 
 
 

राहुल गांधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ट्विट करत तुम्ही भाजपमधील एकमेव बहादुर नेते आहात, असे म्हटले होते. यावर पलटवार करताना नितीन गडकरी म्हणाले कि, माझ्या बहादुरीसाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. भाजप आणि सरकारवर टीका करण्यासाठी तुम्हाला ट्विस्ट केलेल्या बातम्यांच्या आधार घ्यावा लागत आहे, हे आश्चर्य, असा निशाणा नितीन गडकरींनी राहुल गांधींवर साधला.

 
 
 

भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरूनही राहुल गांधींचा चांगलाच समाचार घेण्यात आला. सच्चाई के साथ गुलु-गुलु करेगा तो धोपटेंगेना उसको #SillyBoy”, असा टोला राहुल गांधींना लगावला आहे. या डायलॉगचा वापर कल्पकतेने केल्याबद्दल अनेकांनी भाजपचे कौतूक केले आहे. त्यामुळे राहुल गांधींना तोंडघशी पाडण्यात भाजप यशस्वी ठरली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@