अभिनेत्री शिल्पा शिंदेचा राजकारणात प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिंदेने राजकारणात प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. झी वाहिनीवरील ‘भाभीजी घर पर है’ या विनोदी मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका शिल्पाने साकारली होती. या मालिकेमुळे शिल्पाला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सुरुवातीपासूनच शिल्पाला प्रेक्षकांची पसंती लाभली होती.
 

बिग बॉसच्या घरात अभिनेत्री हीना खानसोबत शिल्पाचे झालेले वाद कायम चर्चेचा विषय ठरले. लोकप्रियतेमुळे शिल्पा शिंदे बिग बॉसच्या दहाव्या पर्वाची विजेती ठरली. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ऐनवेळी शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिल्पा शिंदे ही काँग्रेसची स्टार प्रचारक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शिल्पा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेस पक्ष अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या लोकप्रियतेचा निवडणुकीसाठी फायदा करून घेणार असल्याचे दिसते.

 
 

 
 

अभिनेत्री शिल्पा शिंदे यापूर्वी अनेक कारणांमुळे सतत चर्चेत राहिली होती. तसेच शिल्पाने केलेल्या काही वक्तव्यांमुळे वाद उद्भवला होता. मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक कलाकार खूप चांगले काम करतात. परंतु मराठी कलाकारांमध्ये अहंकार, मीपणा जास्त आहे. मी नाही करणार...असे त्यांचे वागणे असते. मराठी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. असे वादग्रस्त वक्तव्य शिल्पा शिंदेने केले होते. शिल्पाच्या या मराठीद्वेष्टेपणामुळे तिच्यावर सर्वत्र टीका झाली होती.

 

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमुळे शिल्पाला प्रसिद्धी मिळाली होती. परंतु मालिकेच्या निर्मात्यांनी ही मालिका सोडून इतर मालिकांमध्ये काम करण्यास शिल्पाला अटकाव केला होता. त्यामुळे शिल्पाने ही मालिका सोडली. या मालिकेच्या प्रोडक्शन टीममधील लोक त्रास देतात. करिअर संपविण्याची धमकी देतात, असा आरोप शिल्पाने मालिकेच्या प्रोडक्शन टीमवर केला होता. शिल्पाच्या या चुकीच्या वागणुकीविरोधात मालिकेचे निर्माते बिनफेर कोहली यांनी सिन्टामध्ये तक्रार केली होती. त्यानंतर सिन्टाने नॉन कॉर्पोरेशन सर्क्युलर काढण्याचा निर्णय घेतला होता. भविष्यात अभिनेत्री शिल्पा शिंदे कोणत्याही चॅनेल किंवा निर्मात्यांसोबत काम करू शकणार नाही. असा उल्लेख या सर्क्युलरमध्ये केलेला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@