ममतांच्या संविधान बचाव आंदोलनामागे २० हजार कोटींचे घोटाळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |
 

नवी दिल्ली : शारदा चिट फंड घोटाळ्यावरून ममता बॅनर्जींना दणका बसला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जाणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांना रविवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी ममता बॅनर्जींच्या आदेशावरून कोलकाता पोलीसांनी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले होते. यापूर्वी सीबीआयचे पथक कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या लाऊडन स्ट्रीट येथील अधिकारी निवासस्थानी पोहोचले होते. ममता बॅनर्जीही या ठिकाणी पोहोचल्या. केंद्र सरकार हुकूमशाही गाजवत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, या गैरव्यवहारांकडे लक्ष टाकल्यास हे दोन्ही घोटाळे तब्बल २० हजार कोटींचे आहेत हे लक्षात येते.

 

२० हजार कोटींचा गैरव्यवहार

शारदा चिटफंड गैरव्यवहार हा किमान २ हजार ५०० कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दुसरा रोज व्हॅली गैरव्यवहार हा १७ हजार कोटींचा आहे. या प्रकरणात सत्ताधारी पक्ष तृणमुल कॉंग्रेसचा संबंध येत आहे. या दोन्ही गैरव्यवहारांची चौकशी सीबीआय करत आहे. ११ जानेवारी रोजी कॉंग्रेसचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

 

कसा झाला गैरव्यवहार

चिटफंड कंपनीतील गुंतवणूकदारांना आकर्षक गुंतवणूकीचे प्रलोभन देण्यात आले होते. ठेवींचा कालावधी पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदार रक्कम घेण्यासाठी कार्यालयात पोहोचल्या त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. काही दिवसांनी कार्यालये, दुरध्वनी बंद झाले. २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@