आता यूजर्सना ट्विट एडिट करता येणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : सुप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर यूजर्सना आता लवकरच ट्विट एडिट करता येणार आहे. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासाठी ट्विटर एक नवीन फीचर लाँच करणार आहे. या नव्या फीचरद्वारे तुमचे आधीचे ट्विट इतर यूजर्सना दिसेल. तसेच नव्याने एडिट केलेले ट्विटही दिसेल. शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान, ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनी ही माहिती दिली. ट्विट एडिट करण्यासाठी ५ ते ३० सेकंदाचे डिले फीचर आणले जाऊ शकते.
 

आतापर्यंत ट्विटरवर एडिट फीचर का नव्हते? याचे उत्तर देताना जॅक डोर्से म्हणाले की, ट्विटरची निर्मिती एसएमएस म्हणजेच मॅसेजच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे एकदा मॅसेज केल्यानंतर तो डिलीट करता येत नाही. त्याचप्रमाणे एकदा ट्विट केल्यावर ते ट्विट जगभरात दिसते. पण आता ट्विट एडिट करण्यासाठी ५ ते ३० सेकंदाचे डिले फीचर आणले जाऊ शकते. अशी माहिती जॅक डोर्से यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरवर ट्विट एडिट करता येईल असे फीचर उपलब्ध करून द्या. अशी मागणी यूजर्सकडून केली जात होती. असे त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@