जामनेर तहसीलवर विविध मागण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |

 
 
जामनेर
सोमवार रोजी तहसीलवर विविध मागण्यांसाठी जेष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला.फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ जामनेर तालुका यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मार्चाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक सभागृहापासून करण्यात आली.
 
 
या आहेत प्रमुख मागण्या
ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ ऐवजी ६० असावे, नियोजित धोरणा करता लागणार्‍या खर्चाची तरतुद येणार्‍या आर्थिक बजेटमध्ये असावी . श्रावणबाळ वार्धक्य निवृती वेतनात वाढ करावी . ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामुल्य आरोग्य विमा योजना सुरु करावी. तसेच स्वतंत्र विभाग, अयुक्तालय, स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक करावी. ६० वर्षा वरील शेतकरी व शेतमजुरांना शासनाने निवृत्ती वेतन द्यावे. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रतिनिधी मंडळास मुख्यमंत्री यांनी चर्चेकरीता वेळ देवून बेलवावे. महात्मा फुले जिवनदायी योजनेत ज्येष्ठ नागरिकांना सामाविष्ठ करावे. अश्या मागण्या या वेळी करण्यात आल्या.
 
 
आंदोलकांचे निवेदन नायब तहसिलदार दिनकर पाटील यांनी स्विकारले.निवेदन देते वेळी ज्येष्ठ नागरिक संघ जामनेर तालुकाध्यक्ष नारायण महाजन,उपाध्यक्ष डॉ. रामदास पाटील,सचिव रंगनाथ पाटील,पाडुरंग माळी,रसालसिंग पवार, नारायण वाघ,भागवत पाटील,अवधूत सोनवणे, आनंतराव पाटील, प्रभाकर सोनार आदी उपस्थित होते .
@@AUTHORINFO_V1@@