मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा युवक मनोरुग्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |
 
 

मुंबई : साताऱ्या दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पंकज कुंभार अखेर पोलीसांच्या ताब्यात सापडला आहे. सातारा पोलिसांनी त्याला मुंबईतील आग्रीपाडा भागातून ताब्यात घेतले.

 

पंकज कुंभार हा मनोरुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाले आहे. पंकजने त्याच्या फेसबुक वॉलवर ४ फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांसह ४० हजार लोकांना मारण्याची धमकी दिली होती. या पोस्टमुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा खडबडून तपासाला लागली.

 
 

सातारा पोलिसांनी पंकजचा शोध सुरू केला असता तो मुंबईतील आग्रीपाड्यात सापडला. स्थानिक पोलिसांनी त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पंकजची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@