मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०१९ : शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक तरतुदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : मुंबई महापालिकेचा २०१९-२० या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सादर केली. २०१८ - १९ या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ५६९ कोटी रुपये इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १६४ कोटी ४२ लाखांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेचा मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केलाय. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्पाची प्रत दिण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचा २०१९-२० या वर्षांचा हा अर्थसंकल्प एकूण ३० हजार ६९२ कोटी रूपयांचा आहे.


अर्थसंकल्पातील काही महत्वाचे मुद्दे
 

> आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारण्यासाठी २.६० कोटींची तरतूद केली आहे.

 

> भाषा कौशल्य समृद्ध करण्यासाठी १.३० कोटी खर्चून भाषा प्रयोगशाळेची उभारणी करणार आहेत.

 

> टिंकर लॅबसाठी म्हणजे जेथे थ्रीडी डिझाईन, प्रिटींग इलेक्ट्रॉनिक रोबोट बनविणे, मोबाईल अॅप विकसित करणे यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातात त्यासाठी १.४२ कोटींची तरतूद केली आहे.

 

> नाबेट संस्थेद्वारे पालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता मूल्यमापन करण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

 

> विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढवून नैराश्य दूर करण्यासाठी समुपदेशन सेवा देण्यासाठी १ कोटींची तरतूद केली आहे.

 

> पूर्व आणि पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी विज्ञान कुतूहल भवन उभारले जाणार असून यासाठी १.२० कोटींची तरतूद केली जाईल.

 

> विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देण्यासाठी १९.६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये गणवेश, बूट, दप्तर, वह्या, रेनकोटसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार तर इतर वस्तूंची रक्कम अनुदान स्वरूपात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

 

> खेळांच्या साधनासाठी २ कोटींची तरतूद केली आहे.

 

सन २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल,खो-खो,कबड्डी, कुस्ती, तायक्वांदो,ज्यूडो, अक्रोबेटिक्स इतर शासन आयोजित खेळांमध्ये तालुकास्तरावर १३८, जिल्हास्तर ८२२,विभागस्तर १६१,राज्यस्तरीय ६१,राष्ट्रीयस्तर स्पर्धेत १३ असे एकूण ११९५ विद्यार्थी विजयी झाले.

 

पालिका विद्यार्थ्यांना पेंग्विन दर्शन

 

पांढऱ्या शुभ बर्फामध्ये तुरुतुरु चालणाऱ्या सुबक, ठेंगण्या पेंग्विनबद्दल सगळ्यांना लहानपनापासून आकर्षण असते. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना पेंग्विन पाहता यावेत म्हणून शैक्षणिक सहल ही पेंग्विन दर्शनासाठी राजमाता जिजामाता उद्यान येथे जाणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@