मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०१९ : शिक्षणासाठी २७३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : मुंबई महापालिकेचा २०१९-२० या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सादर केली. २०१८ - १९ या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ५६९ कोटी रुपये इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १६४ कोटी ४२ लाखांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेचा मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केलाय. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्पाची प्रत दिण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचा २०१९-२० या वर्षांचा हा अर्थसंकल्प एकूण ३० हजार ६९२ कोटी रूपयांचा आहे.

 

शिक्षण अर्थसंकल्पातील नव्या तरतुदी

 

सीसीटीव्ही कॅमेरा - २४.३० कोटी

ई लर्निंग - १.३० कोटी

डिजिटल क्लासरूम - ८ कोटी २४ लाख

टॉय लायब्ररी व नवीन बालवाडीसाठी - ७ कोटी ३८ लाख

मिनी सायन्स सेंटर्स - ६६ लाख

डेस्क व बेंचसाठी - ९ कोटी ८७ लाख

शालेय इमारतींच्या दुरुस्तीसाठी - २०१.७३ कोटी

व्हर्चुअल क्लासरूम - १६.९२ कोटी

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी - ३ कोटी

 

संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा या लिंकवर : 

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@