ममता बॅनर्जी आरोपीला संरक्षण देत आहेत : राजनाथ सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींना संरक्षण दिला जात असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलन नाट्य़ाचे पडसाद सोमवारी संसदेतही उमटले. तृणमुल कॉंग्रेसच्या सदस्यांनी यावेळी गोंधळ घातला. या गोंधळात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन सादर केले.

 

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सीबीआय अधिकाऱ्यांना अशाप्रकारे डांबून ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. या चिटफंड घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. कोलकात्यामध्ये रविवारी सायंकाळपासूनच हे आंदोलन नाट्य सुरू आहे.

 

रविवारी कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी सीबीआय अधिकारी चौकशीसाठी गेले होते. राजीव कुमार यांची चौकशी होणार होती. मात्र, कोलकाता पोलीसांनी सीबीआय अधिकाऱ्यांना अडवत कारवाईत अडथळा आणला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ठिकाणी हजर झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी यामुद्द्यावरून धरणे आंदोलन केले आहे.

 

या प्रकरणी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगाल सरकार तपासात मदत करत नसल्याचा आरोप करत सीबीआय अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कोलकात्याचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@