यावत तालुक्याचे उतारे देणे काम बाकी असल्याचे जाहिर करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |

न्हावी येथिल शेतकर्‍याची मागणी

 
 यावल : ४
राज्य शासन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजीटल होत आहे. सर्वत्र संगणीकृत उतारे मिळत आहे परंतु न्हावी येथील शेतकर्‍याला संगणीकृत उतारा मिळत नसल्याने यावल तालुक्याचे उतारे देणे काम बाकीअसल्याचे जाहिर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 
 
शासनाने नुकतेच जाहीर केले की ८४ गावातील संगणीकृत उतारे देणे पूर्ण झाले आहे परंतु न्हावी येथील शेतकरी रामभाऊ पाचपांउे यांना सर्वे नंबर ६४१ / ३ ब / १ या गटाचा उतारा मिळत नसल्याबाबत २०११ सालापासून पाठपुरावा करत आहे. त्यांना जमिनीचा गट नंबर चा उतारा मिळत नाही. म्हणून त्यांनी यावल तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेवून २१ एप्रिल २०१६ रोजी अर्ज दिला त्याची सर्कल यांनी प्रत्यक्ष चौकशी केली . परंतु उत्तर मिळाले नाही यावल तहसीलदारांनी भेट देऊन देखील उपयोग झाला नाही . या गटाचा उतारा मिळावा अन्यथा यावल तालुक्यात चे उत्तरे देणे काम बाकी राहिले असे जाहीर करावे असे येथील शेतकरी रामभाऊ पाचपांडे यांनी लेखी दिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@