महाराष्ट्रात १० टक्के सवर्ण आरक्षण होणार लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सवर्ण वर्गाला शैक्षणिक आणि शासकीय नौकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळेल. राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला. सवर्ण आरक्षण विधेयक ८ जानेवारीला लोकसभेमध्ये मांडण्यात आला होता. त्यानंतर तो तिथे बहुमताने पास झाला. त्यानंतर संसदेचे वरीष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेतही त्याला मंजूरी मिळाली होती.

 
 
 

केंद्र सरकारने यासंदर्भात कायदा केल्यानंतर गुजरातसारख्या अनेक राज्यांनीही या कायद्याची अंमलबजावणी केली होती. आता महाराष्ट्रातही हा सवर्ण आऱक्षणाचा कायदा लागू झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत सर्व राज्यांना आदेश दिले होते. केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने अधिसूचना जारी करत संविधान (१०३वे संशोधन) अधिनियमाच्या माध्यमातून संविधानाच्या अनुच्छेद १५ आणि १६मध्ये संशोधन केले होते. लोकसभेत आणि राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींनी याला मान्यता दिली होती. त्यानंतर याचे कायद्यात रुपांतर झाले होते. यानंतर सोमवारी महाराष्ट्र सरकारने सवर्ण आरक्षण राज्यात लागू केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@