सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण : शशी थरूर यांच्याविरोधात २१ फेब्रुवारीला सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : काँग्रेस नेते व खा. शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी थरूर यांच्याविरोधात येत्या २१ फेब्रुवारी रोजी दिल्ली सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहेदि. १८ जानेवारी, २०१४ रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा मृतावस्थेत सापडल्या होत्या. या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ अ आणि कलम ३०६ अंतर्गत थरूर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आणि क्रूरतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.

 

त्यांना या प्रकरणी अद्याप अटक झालेली नसून गेल्यावर्षी त्यांना जामीन मिळाला आहे. २०१४ मध्ये थरूर यांच्या निवासस्थानाचे बांधकाम सुरू असल्याने थरूर सुनंदा पुष्कर यांच्यासमवेत दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होते. येथेच सुनंदा दि. १८ जानेवारी, २०१४ रोजी मृतावस्थेत सापडल्या होत्या.

 

केरळमधील तिरूवनंतपुरमचे खासदार असलेल्या आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर अशाप्रकारे मृत सापडल्याने खळबळ उडाली होती व हे सारेच प्रकरण संशयास्पद बनले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@