आरोपात तथ्य नाही; तेलतुंबडेचा कांगावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |


 
 
 
 
मुंबई : माझ्यावरील माओवाद्यांशी संबंध असल्याचा, माओवाद्यांनी पॅरिसमधील परिषदेला पैसा पुरवल्याचा तसेच शनिवार वाड्यावरील एल्गार परिषद व नंतर उसळलेल्या दंगलीत हात असल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा कांगावा पुणे सत्र न्यायालयाने जामिन नाकारलेल्या आणि केवळ तांत्रिक कारणामुळे ११ फेब्रुवारीपर्यंत तुरुंगात जाण्यापासून वाचलेल्या डॉ. आनंद तेलतुंबडे याने केला आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गेल्या काही महिन्यांत समाजात वावरणाऱ्या पांढरपेशा प्रितिष्ठितांना पोलिसांनी अटक केली, तेव्हा आनंद तेलतुंबडे यांने या विरोधात लेख लिहिले होते. यावर तो म्हणाला की, मी केवळ गेल्या काही महिन्यांत पकडल्या गेलेल्या विचारवंत व बुद्धीवाद्यांसाठी झटत होतो व लेख लिहित होतो, माझा त्यांच्याशी संबंध नाही. 
 
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने डॉ. तेलतुंबडे याच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम दि. ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता, यावेळी तेलतुंबडे याने आपली बाजू मांडली. सुरुवातीला या वार्तालापासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड आले, मात्र कसलेतरी कारण सांगून ते निघून गेले. नंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा वार्तालाप झाला. मात्र आयोजकांनी सुरुवातीलाच तेलतुंबडे यांना प्रश्न नविचारता केवळ माहिती घ्यावी असे आवाहन केले. कदाचित अडचणीत टाकणारे प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरे देणे शक्य नसल्याने आयोजकांनी ही भूमिका घेतली असावी. यावेळी माझ्याविरोधात पोलिसांनी रचलेले हे सगळे कुभांड आहे, असे म्हणत पोलिसांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न तेलतुंबडेने केला. स्टेट व्हर्सेस सिटीझन म्हणजे केवळ माझ्याच विरोधात नव्हे तर सगळ्याच सर्वसामान्य भारतीयांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांकडून अशी कारवाई केली जाईल, असे बेधडक विधानही तेलतुंबडेने केले. वार्तालापाला उपस्थित असलेल्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी पोलिसांनी दाखवलेले माओवाद्यांचे पत्र खोटे असून मला बचावाची संधीच मिळू नये यासाठी युएपीए या घटनाबाह्य कायद्याखाली गुन्हा दाखल करत अटक केल्याचे तेलतुंबडे म्हणाला.
 

एल्गार परिषदेचे आयोजन आम्ही केल्याचे न्या. पी. बी. सावंत आणि न्या. बी. जी. कोळसे पाटील सांगतात, तरीही त्याच्याशी माझा संबंध लावण्याचा प्रकार केला जातो, असे म्हणत तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला. सोबतच माओवाद्यांचे म्हणून जे पत्र पुणे पोलिसांनी सादर केले, ते बनावट आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनीही ते पत्र नाकारले, पण पोलिस खोटीच कहाणी सांगतात, असा दावा केला. जामिनाबाबत तेलतुंबडेने सांगितले की, न्यायालयीन प्रक्रिया चालूच असते. तुरुंगातून आत व नंतर बाहेर हेच करावे लागेल. शिवाय खेड्यापाड्यातील माओवाद्यांना बाजूला करत शहरी भागात सरकारविरोधात बोलणाऱ्यांना माओवादी ठरवून अटक केले जाते, असेही तो म्हणाला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@