सुप्रजा-भाग ५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |


आज आपण गर्भाची दर महिन्याला होणारी वाढ, मासानुमासिक वृद्धी याबद्दल जाणून घेऊया. आयुर्वेदशास्त्राने गर्भाची वाढ दर महिन्यात कशी होते, हे सांगून ठेवले आहे. त्याचबरोबर मातेच्या शरीरातलेही बदल सांगितले आहेत. आधी गर्भाची वाढ बघूया.

 

स्त्री शरीरात गर्भधारणा होते. स्त्रीबीज पुरुषबीज गर्भाशयात एकत्र आल्यावर गर्भधारणा झाली, असे म्हटले जाते. पण, ही गर्भधारणा लगेच कळून येत नाही. काही वेळेस काही शारीरिक बदल, काही सवयींमध्ये बदल घडू लागतो. गर्भधारणा झाल्यापासून प्रसुती होईपर्यंत मासिक पाळी बंद होते. बहुतांशी वेळेस मासिक पाळीची तारीख उलटून गेल्यावरच गर्भधारणा झाली आहे की नाही, हे तपासले जाते. यामध्ये प्राथमिक लघवी परीक्षण (Urine Pregnancy Test) केले जाते. काही वेळेस रक्त तपासणी,सोनोग्राफीही केली जाते. काही वेळेस गर्भ राहिल्यानंतर मळमळणे, उलटी होणे, स्तन जड होणे, तोंडाला चव नसणे, अस्वस्थ वाटणे, अनिच्छा, अनुत्साह इत्यादीपैकी एखादे किंवा सर्वच लक्षणे उद्भवू शकतात. काही वेळेस कोणताच त्रास होत नाही. प्रत्येक शरीराची प्रतिक्रिया ही वेगवेगळी असते. ही लक्षणे असणे चांगले की वाईट, असा जेव्हा प्रश्न माझे रुग्ण दवाखान्यात विचारतात; तेव्हा माझे उत्तर असे असते की, हे बरोबर की चूक, चांगले की वाईट, असे काही नसते. प्रत्येक शरीर एखाद्या परिस्थितीत भिन्न प्रतिक्रिया देते. म्हणजे पहिल्या दिवसापासून उलटी होणे किंवा पूर्ण नऊ महिने काही त्रास न होणे, यात कुठलेच चांगले अथवा वाईट नसते किंवा बरोबर की चूक नसते. पण, गर्भधारणा झाली आहे की नाही, हे खात्रीशीरपणे या लक्षणांवरून सांगणे कठीण होते. म्हणून वर सांगितलेल्या तपासण्या करून घ्याव्यात. शरीरात बदल होतात, तसेच मानसिकरीत्याही काही बदल घडतात. या बदलांबद्दल सविस्तर नंतर बोलू. आज आपण गर्भाची दर महिन्याला होणारी वाढ, मासानुमासिक वृद्धी याबद्दल जाणून घेऊया. आयुर्वेदशास्त्राने गर्भाची वाढ दर महिन्यात कशी होते, हे सांगून ठेवले आहे. त्याचबरोबर मातेच्या शरीरातलेही बदल सांगितले आहेत. आधी गर्भाची वाढ बघूया.

 

पहिल्या महिन्यात जेव्हा स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र येतात तेव्हा एक कलल (कालवणासारखे) तयार होते. यामध्ये पेशींचा विशिष्ट आकार नसतो. LOOSELY FORMED MASS OF CELLS WITH INDEFINITE SHAPE हा मांसाचा गोळा अस्थिर असतो. त्याचा आकार (SHAPE + SIZE) बदलत राहतो. हा ‘कलल’ मनुष्य शरीरासमान अजिबात दिसत नाही. या स्थितीत कलल हा खूप घन स्वरूपाचा नसतो. या ‘कलल’ला ‘गर्भ’ ही संज्ञा तेव्हाच दिली जाते, जेव्हा त्यात आत्मा प्रविष्ट होतो. म्हणजे फक्त काही पेशी एकत्र येऊन गोळा तयार झाला म्हणजे तो गर्भ होत नाही. यामध्ये शारीरिक घटकांबरोबरच आत्म्याचाही समावेश आहे. थोडक्यात असेही म्हणता येईल की, सर्व गुणसंपन्न आत्मा गर्भावस्थेत सर्व धातूंचे समिश्रणस्वरूप आहे

 
दुसर्‍या महिन्यात या ‘कलल’स्वरूपी गर्भावर पंचमहाभूतांचा व्यापार होतो. प्रक्रिया होते. याला घनत्व (Solidification) प्राप्त होते. हाडामांसाचा गोळा थोडा अधिक घन होतो. आयुर्वेदानुसार दुसर्‍या महिन्यात गर्भाचे लिंग निश्चित होते. आधुनिक विज्ञानानुसार जेव्हा Conception होते, त्याच वेळेस गर्भाचे लिंग ठरते. पण, आयुर्वेदाने असे सांगितले आहे की, गर्भ राहिल्याक्षणी गर्भात दोन्ही लिंगे सुप्त स्वरूपात उपस्थित असतात. दुसर्‍या महिन्यामध्ये त्यातील एका लिंगाची वाढ होते आणि दुसरे सुप्त राहते. पहिल्या महिन्याच्या ‘कलल’ स्वरूपावर त्रिदोषांचे (वात-पित्त आणि कफाचे) परिणाम होऊन त्या पेशी अधिक घन होतात. या घन स्वरूपाचा गर्भ ज्या विशिष्ट आकाराचा होतो, (३ आकार होऊ शकतात) त्यानुसार गर्भाचे लिंग ठरते. या घनस्वरूपी गर्भाचे ३ पिंड उत्पन्न होतात. या महिन्यामध्येही हा गर्भ मनुष्य गर्भ आहे असे ओळखता येत नाही. गर्भाला पुरुष गर्भाचे स्वरूप येण्यास तिसरा महिना लागतो. पण, त्या स्वरूपात येण्यासाठी लागणारी सर्व सामुग्री या ‘कलल’मध्ये असते. दिवसेंदिवस हा कलल, घन गर्भ बदलत असतो, वाढत असतो. पुरुष स्वरूपाच्याजवळ येत असतो. पण, फक्त शारीरिक बदलच नव्हेत, तर मानसिक जडणघडणही होत असते. म्हणून मातेने सकारात्मक आणि प्रसन्न राहणे अत्यंत गरजेचे आहे. खूप खिन्न मन, तणावग्रस्त असल्यास, चीडचीड, भीती, चिंता इ. मानसभावांचा पोटातील गर्भावर अनिष्ट परिणाम होतो. काही परिणाम या गर्भाला भोगावे लागतात, तर काही बीजस्वरूप गर्भात रुजले जातात आणि त्याची वाढ तिसर्‍या पिढीत होताना दिसते. याबद्दलचे काही शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. मेडिकल जर्नल्समध्ये तेव्हा फक्त शारीरिक वाढ अपेक्षित न ठेवता सर्वांगीण उत्तम वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत.
 

तिसर्‍या महिन्यात जे तीन घन पिंडांचा गर्भ असतो, तो आता वाढून पाच पिंडांचा होतो. यापासून पुढे दोन हात, दोन पाय आणि डोके निर्माण होते. या गर्भामध्ये ज्ञानेन्द्रियांची निर्मिती सुरू होते. मनुष्याला पाच ज्ञानेन्द्रिये आणि पाच कर्मेन्द्रिये असतात, (ज्ञानेन्द्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन्स, ज्याने आपल्याला सभोवतालचे ज्ञान होते. जसे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक) पाच कर्मेन्द्रिये म्हणजे अ‍ॅक्शन ऑर्गन्स, ज्याद्वारे शरीर काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे मन. मनाला आयुर्वेदात उभयात्मक इंद्रिय म्हटले आहे. म्हणजे, मन हे ज्ञानेन्द्रियांचेही कार्य करते तसेच कर्मेन्द्रियांचेही करते. उदाहरणार्थ, टीव्ही बघते वेळी त्यात एकाग्र झालो असताना किंवा मोबाईलवर खेळत असताना, दार वाजले, कोणी हाक मारली, तर त्याकडे लक्ष जात नाही. याचाच अर्थ ऐकू आले नाही असा होतो का? तर नाही. ऐकू आलेले असते, पण मोबाईल, टीव्हीमध्ये एकाग्र झाल्यामुळे ऐकणे हे कार्य होऊनसुद्धा त्यावर प्रतिसाद दिला जात नाही. म्हणजेच ज्यात मन असते, त्याचेच ज्ञान होते आणि मनापासून आलेला संदेशानुसार कर्मेन्द्रिये कार्य करत असतात म्हणून मनाला ‘उभयात्मक इंद्रिय’ म्हटले जाते. म्हणजेच मन हे ज्ञानेन्द्रियाचेही काम करते आणि कर्मेन्द्रियाचेही.

 

तिसर्‍या महिन्यात गर्भाचे हृदयही कार्यरत होते. म्हणजे स्त्रीशरीरात स्वत:चे हृदय आणि मातेचे हृदय अशी दोन हृदयं सुरू होतात. म्हणून गर्भिणीच्या तिसर्‍या महिन्यात ‘दौहृदय’ही म्हटले जाते. या महिन्यापासून गर्भिणीच्या आवडी-निवडीमध्ये फरक पडू लागतो. पण सगळ्यांमध्ये होतो असे नाही. गर्भिणीला जी गोष्ट अतिप्रिय असते (चहा, Icecream, Non-veg.इ.) त्याबद्दल घृणा, तिरस्कार, अरूची उत्पन्न होते आणि काही वेळेस जे आवडत नव्हते, ते खाण्याची इच्छा होते. ही इच्छा केवळ आहारापुरती सीमित नसते. झोप, राहणीमान, पोशाख, विचार इ. गोष्टींमध्ये बदल घडतो. हे बदल म्हणजे गर्भिणीच्यामार्फत गर्भ आपल्या इच्छा-आकांक्षा सांगत असतो, खुणावत असतो. जर शरीरोपयोगी हे ‘डोहाळे’ असतील, तर ते जरूर पूर्ण करावेत. हे पूर्ण केले नाही, तर गर्भात विकृती (शारीरिक किंवा मानसिक) उत्पन्न होऊ शकते. डोहाळे हे इन्द्रियांमुळे (Sense Organs Am{U Action Organs)मुळे उत्पन्न झालेले असतात. गर्भाच्या इच्छा (सुप्त) आहेत. तिसर्‍या महिन्यापासून हा मनुष्य गर्भ असल्याची प्रचिती हळूहळू होऊ लागते. या पहिल्या तीन महिन्यांमध्ये जी वाढ होते, ही विविध अंगप्रत्यंगांचे मूळ उत्पन्न होते, या स्वरूपाची असते. या गर्भाचे वजन व आकृती वाढते. पण, पुढील महिन्यांमध्ये होते तितक्या प्रमाणात होत नाही. या तीन महिन्यांमध्ये गर्भ अस्थिर असतो, गर्भपात (Abortion) होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अति शारीरिक कष्ट आणि मानसिक यातना होतील, अशा गोष्टी टाळाव्यात.

 

(क्रमशः)

- वैद्य कीर्ती देव

[email protected]

९८२०२८६४२९

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

 
@@AUTHORINFO_V1@@