भुसावळ नगरपरिषद हद्दवाढ फेर प्रस्तावाला मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |
 
 
भुसावळ :
   येथील नगरपरिषदेची तातडीची विशेष सभा ४ रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, गटनेते हाजी मुन्ना तेली उपस्थित होते. भुसावळ नगरपरिषद हद्दीत सध्या साडे तेरा चौरस किलो मीटरचा भाग असून साडे चार ते पाच चौ.कि.मी.रेल्वेची संपत्ती अशी एकूण नऊ कि.मी.जागा आहे.शासनाच्या निर्णयानुसार नगरपरिषदेला सद्याच्या जागेपेक्षा अडीच पटीने हद्दवाढ करावी लागणार असल्याने ही तातडीची विशेष सभा झाली.सभेत माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी रहिवास क्षेत्र सोडून हद्दवाढ करण्याची सूचना मांडली तर विरोधी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी हद्दवाढ करण्यापूर्वी विस्तारित भागात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने हंडा मोर्चा काढावा लागत असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष रमण भोळे व नगरसेवक प्रा.सुनिल नेवे यांनी ही तातडीची विशेष सभा हद्दवाढ फेर प्रस्तावास मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी असून पाण्याच्या विषयाकरिता नसल्याने चांगल्या कामाला फाटा फोडू नये असे आवाहन केले.या विशेष सभेत सर्व सत्ताधारी नगरसेवक उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@