सीमांचल एक्सप्रेस रुळावरून घसरली; ७ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2019
Total Views |



 

पाटणा : बिहारमधील सहदाई बुजुर्ग येथे सीमांचल एक्स्प्रेसचे शनिवारी उशीरा रात्री ९ डबे रुळावरून घसरले आहेत. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावाचे कार्य सुरू आहे. हाजीपूर-बछवाडा दरम्यान जोगबनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या या सीमांचल एक्सप्रेसला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

 

हा अपघात इतका भीषण होता की, एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर आले. एक द्वितीय श्रेणीचा डबा, वातानुकूलित बी३, एस८, एस९, एस१० या डब्यांसह आणखी चार डबे रुळांवरून घसरले असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वेने अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपये, गंभीर जखमींना १ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. दरम्यान, प्रथमदर्शनी हा अपघात रेल्वे रुळाला तडा गेल्याने झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. तर, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले आहेत.

 
 
 
 

तडा गेलेल्या रुळामुळे सीमांचल एक्स्प्रेसचा अपघात

 

रेल्वे रुळाला मोठी भेग पडल्यामुळे हा अपघात झाला, असे प्राथमिक तपासात म्हटले जात आहे. घटनेचा तपास पूर्व रेल्वेचे रेल्वे सुरक्षा विभागाचे मुख्य आयुक्त लतीफ खान करत आहेत. सध्या घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रशासनाला सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@