भूमिपूजन मी केले, उदघाटनही मीच करणार ; पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2019
Total Views |


 


जम्मू - "इमारतीचे भूमिपूजन आपण केले असून जनतेचा आशीर्वाद मिळाला तर त्याचे लोकार्पणही मीच करणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहला भेट दिली असता सांगितले. ते रविवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले असून दोन दिवसाच्या या दौऱ्यात जम्मू-कश्मीर आणि लडाख या तिन्ही ठिकाणी भेटी देणार आहेत. लेहमध्ये उभारण्यात येणाऱ्या विमानतळाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधानांनी यावेळी केले. ज्यानंतर त्यांनी कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला.

 

मोदींचे लेहमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. मोदींचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानला जात आहे. "तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत राहता, ज्या समस्यांना तोंड देता, ती माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. तुमच्यासाठी मला खूप काम करायचे आहे. तुम्ही जे प्रेम मला दिले आहे ते पूर्ण व्याजासकट तुमचा विकास करुन परत करायचे आहे." असे आश्वासन मोदी यांनी लेहवासियांना दिले.

 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "केंद्र सरकार 'सबका साथ-सबका विकास' या धोरणानुसार काम करत आहे. देशातील कोणतीही व्यक्ती, कोणतेही क्षेत्र विकासापासून वंचित राहणार नाही. यासाठी सलग साडे चार वर्षापासून हे सरकार सतत काम करत आहे." बिलासपूर-मनाली-लेह हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते लेहदरम्यानचं अंतर कमी होणार असून, त्याचा फायदा थेट पर्यटन क्षेत्राला होणार असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी स्पष्ट केला. रविवारी लेह येथे पोहोचलेल्या मोदींनी विविध विकास कामांची पाहणी करत २२० केव्ही ट्रांसमिशनच्या रेल्वेमार्गाचे उदघाटनही केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@