‘भारत के मन की बात, मोदीजी के साथ’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी जनतेच्या सहभागाने संंकल्पपत्र (जाहीरनामा) तयार करण्याच्या भाजपच्या राष्ट्रीय अभियानाचा रविवारी राजधानी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री तसेच संकल्पपत्र समितीचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. चाणक्यपुरी परिसरातील हॉटेल अशोकामध्येझालेल्या ‘भारत के मन की बात मोदीजी के साथ’ या महिनाभर चालणाऱ्या अभिनव स्वरूपातील संकल्पपत्र अभियानातील रथांना अमित शाह आणि राजनाथसिंह यांनी रविवारी हिरवी झेंडा दाखवला. देशभरातील १० कोटी मतदारांच्या आशा-आकांक्षा समजून घेत भाजप २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवा भारत घडवणारा आपला जाहीरनामा तयार करणार आहे. लोकांमध्ये जाऊन आणि त्यांच्या सूचना ऐकून जाहीरनामा तयार करणारा भाजप हा देशातील ‘सबका साथ सबका विकास’चा पहिलाच राजकीय पक्ष ठरला आहे.

 

लोकशाही पद्धतीने होणार जाहीरनामा : अमित शाह

 

लोकशाही पद्धतीने आपला जाहीरनामा तयार करण्याच्या उद्देशाने भाजपने ही पद्धत अवलंबली आहे. लोकांना कसा भारत हवा आहे, हे आम्ही यातून समजून घेणार आहोत. यातून भारतातील लोकशाही अधिक मजबूत होणार आहे,” असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले. “लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी ३०० रथ देशभर फिरणार आहे. देशातील सर्व विधानसभा मतदारसंघात ७,७०० सूचना पेट्याही ठेवण्यात येणार आहेत. भाजपने संकल्पपत्र अभियानासाठी संकेतस्थळही तयार केली आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप, मिस्डकॉल या मार्गानेही लोकांना भाजपच्या संकल्पपत्रासाठी आपल्या सूचना करता येतील,” असे अमित शाह म्हणाले. “लोकांकडून मिळणाऱ्या सूचनांचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करण्यासाठी राज्यस्तरावर २० कार्यकर्त्यांचा चमू तयार करण्यात आला आहे. राज्यांकडून येणाऱ्या अहवालांचा आढावा घेत भाजपच्या संकल्पपत्राला अंतिम रूप देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ३० सदस्यांची समिती राजनाथसिंह यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. देशाची वाटचाल निवडणुकीच्या दिशेने सुरू झाली आहे, देशाच्या विकासाची पुढील पाच वर्षांची दिशा यातून निश्चित केली जाणार आहे,” असे शाह यांनी सांगितले.

 

देशाला महाशक्ती करणार : राजनाथसिंह

 

देशाला महाशक्ती बनविण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचे संकल्पपत्र समितीचे प्रमुख राजनाथसिंह यांनी सांगितले. जनतेच्या भावना समजून घेत संकल्पपत्र तयार करणे हे आमचे कर्तव्यच नाही, तर नैतिक जबाबदारीही आहे. देशातील बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारने खूप काही केले आहे, पण यावर आम्ही समाधानी नाही. खूप काही करायचे आणखी बाकी आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे जनतेला काय हवे, हे आम्ही जनतेपर्यंत जाऊनच समजून घेणार आहोत,” असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, थावरचंद गहलोत, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, भाजपचे महासचिव राम माधव, माध्यम विभागाचे प्रमुख अनिल बलुनी, सहप्रमुख संजय मयुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

 

१२ विषयांसाठी भाजपच्या १२ समित्या

 

संकल्पपत्रासाठी कृषी, रोजगार, अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा असे १२ विषय निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक विषयासाठी संयोजक आणि सहसंयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

विविध समित्यांचे प्रमुख :

 

>कृषी - शिवराजसिंह चौहान

>युवा - राजीव चंद्रशेखर

>महिला व बाल कल्याण - स्मृती इराणी

>अनुसूचित जाती/जमाती - थावरचंद गहलोत

>अर्थव्यवस्था, उद्योग - अरुण जेटली

>सुशासन - डॉ. हर्षवर्धन

>पायाभूत सुविधा - हरदीप पुरी

>मनुष्यबळ विकास - प्रकाश जावडेकर

>राष्ट्रीय सुरक्षा - भुवनचंद्र खंडुरी

>परराष्ट्र - डॉ. विनय सहस्रबुद्धे

>गंगा, संस्कृती, राममंदिर - महेश शर्मा

>रोजगार, श्रम - बंडारु दत्तात्रेय

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@