अडथळे दूर करत धावणार मुंबई नाशिक लोकल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2019
Total Views |


 


ठाणे : मध्य रेल्वेच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणजे मुंबई-नाशिक मार्गावरील लोकल. या लोकलची मगील आठवड्यात चाचणीही करण्यात आली. दरम्यान, ही लोकल धावण्यासाठी कसारा घाटातील अडथळे दूर करुन तिसरी मार्गिका वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे साहाय्यक विभागीय व्यवस्थापक व्ही. ए. मालेगावकर यांनी दिली आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मुंबई-नाशिक या मार्गावर लोकल धावण्यसाठी कसारा घाटातील चढ, उतारांचा आणि वळणांचे अडथळे चाचणी दरम्यान जामवले, त्यामुळे या अडचणी दूर केल्यानंतर पुन्हा एकदा या लोकलची चाचणी होणार आहे.

 

गेल्या वर्षभरात ४ वेळा मुंबई-नाशिक मार्गावर लोकलच्या फिरतीच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. सध्या या रेल्वेमार्गावरील लोकलच्या चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. लवकरच ही लोकलसेवा सुरु होणार असल्याने नाशिक अगदी मुंबईच्या टप्प्यात पोहचणार असल्याचा मानस मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई ते नाशिक असा दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, चाकरमानी आणि व्यावसायिकांसाठी मध्य रेल्वे आणि आरडीएसओने आनंदाची बातमी दिल्याने मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना आता थेट लोकलने प्रवास करता येणार आहे.

 

मुंबई-नाशिक लोकलकरिता १२ डब्यांच्या लोकलगाड्या या मार्गावरुन धावणार असून, त्यांच्या बांधणीचे काम चेन्नई येथे सुरु असल्याची माहितीही मालेगावकर यांनी दिली. नाशिककरांचा राष्ट्रीय महामार्गावरील सध्याचा प्रवासही सुखकर बनला आहे. त्याप्रमाणेच रेल्वेमार्गावरीलही प्रवास सुखकर करण्यासाठी मागील २ वर्षांपासून मुंबई ते नाशिक अशी थेट लोकलसेवा सुरु करण्याचा मध्यरेल्वेचा मानस होता. या रेल्वे प्रवासासाठी कसारा ते इगतपुरी हे १७ मिनिटांचे अंतर असून रेल्वे मार्गावर ६ बोगदे आहेत.

 

भूसंपादनाची प्रक्रिया सुरु

 

कसारा घाटात लोकलसाठी रेल्वेमार्गावर तिसरी मार्गीका वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्यासाठी टिटवाळा ते आसनगांव स्थानकांपर्यंत भूसंपादन झाले आहे. मात्र, आसनगांवपासून पुढे नाशिकपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे साहाय्यक विभागीय व्यवस्थापक व्ही. ए. मालेगावकर यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@