उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून ३ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2019
Total Views |


 


ठाणे : उल्हासनगर कॅम्प ३ येथील इंदिरा गांधी मार्केट परिसरातील मेमसाब इमारतीचा अंतर्गत स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये २ महिला आणि एका चिमुरडीचा समावेश आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्यावर आणि पहिल्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर असलेल्या 'आशिर्वाद' या क्लिनिकमध्ये दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कोसळला. यावेळी क्लिनिकचे डॉक्टर लाल रिझवानी यांच्याकडे उपचारासाठी आलेले रुग्ण त्याखाली दबले गेले. या स्लॅबखाली दबून नितु शतीजा आणि अनिता मोरया या २ महिला आणि प्रिया मोरया या २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही इमारत धोकादायक असल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

 

या घटनेची माहिती उल्हासनगर महापालिका प्रशासनाला मिळताच अग्निशामक दल, पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेत लाल रिझवानी यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या ४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उल्हासगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु असून खबरदारीचा उपाय म्हणून इमारत रिकामी करून सिल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@