भारतीय सैन्यदलांची मोठी घोषणा : “पाकच्या दहशतवादी तळांना असेच उध्वस्त करत राहू”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2019
Total Views |

 


नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाकिस्तानला तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. भारताचे लष्कर, वायुसेना आणि नौदल तयार असल्याचा विश्वास त्यांनी देशवासीयांना दिला. आमचा लढा आतंकवादाविरोधात असून आम्ही यापुढेही दहशतवादी तळांवर अशाचप्रकारे नेस्तनाबूत करू, असा सज्जड दम त्यांनी पाकिस्तानला यावेळी दिला. पाकिस्तानी एफ १६ या विमान पाडल्याचे पुरावे यावेळी सादर करण्यात आले. बालाकोटवरील हल्ल्याचे पुरावेही आम्ही सादर करू असे यावेळी सांगण्यात आले.

 

यावेळी वारंवार धमक्यांचा फुसका बार वाजवणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा भारतीय सैन्यदलाने फाडला. पाकिस्तानने सतत खोटे बोलत आपल्या नापाक कुरापती चालुच ठेवल्या आहेत. भारताची दोन विमाने पाडल्याचा दावाही खोटा ठरला. उलट पाकिस्तानचे एफ १६ हे विमान भारताने पाडले. पाकिस्तान वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानच्या सर्व नापाक कारवाया आम्ही हाणून पाडल्याचे त्यांनी सांगितले. पाकला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची तिन्ही सैन्यदल तयार असल्याचा विश्वास त्यांनी भारतीय नागरिकांना दिला आहे.


बुधवार, २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या विमानांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण तातडीने पाकिस्तानला चोख प्रत्त्युत्तर दिले आणि पाकची विमाने परतवून लावली. अशी माहिती भारतीय लष्कराने या पत्रकार परिषदेत दिली.

पाकिस्तानची विमाने आपण पाडली आणि काही विमाने परतवून लावली हे मानण्यास पाकिस्तान नकार देत आहे. पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे युद्ध करण्यास आपण सक्षम आहोत. पाकिस्तानला तातडीने प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे. शांतता प्रस्थापित करणे हे भारतीय लष्कराचे परम कर्तव्य आहेच. अशी माहिती या पत्रकार परिषदेत लष्कराकडून देण्यात आली.

आपण हाय स्टेट ऑफ रेडीनेस मध्ये आहोत. अर्थात पाकिस्तानकडून करण्यात आलेला कोणताही हल्ला परतवून लावण्यास आपण सक्षम आहोत. असे भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले. हल्ला होणे रोखणे, त्यासाठी सतर्कता आणि सावधानता ठेवण्याचे काम भारतीय नौदल करत आहे. पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही प्रकारचा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय नौदल सदैव तत्पर आहे. देशाची सुरक्षा ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आम्ही तीन्ही दल एक आहोत.

 

प्रश्न : पाकिस्तान भारतीय लष्कराला, लष्करातील जवानांना लक्ष्य करत आहे का?

उत्तर : पाकिस्तानचा प्रयत्न हा तसाच आहे. पण आपण तातडीने चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहोत.

 

प्रश्न : सीमेवर कशी परिस्थिती आहे? तणावपूर्ण स्थिती आहे का?

उत्तर : आपली लढाई दहशतवादाविरोधात आहे. दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रांची ठिकाणे आणि दहशतवादी तळे उध्वस्त करत आहोत, पाकिस्तानला जशाच तसे उत्तर देत आहोत.

 

प्रश्न : सीमेवरील खरी परिस्थिती काय आहे? सगळे सुरळित कधी होईल?

उत्तर : हे सांगता येणे कठीण आहे. पण कोणताही हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्यास आपण सदैव तयार आहोत.

 

प्रश्न : २६ फेब्रुवारी रोजी करम्यात आलेला एअर स्ट्राईक खरा आहे का? पाकिस्तानचे ३५० दहशतवादी आपण मारले आहेत का? हा आकडा खरा आहे का?

उत्तर : आपण पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट केली. मृतांची आकडेवारी आता सांगता येणार नाही. पण आपण ही दहशतवादी ठार केले आहेत हे निश्चित.

 

प्रश्न : सतत तणावपूर्ण स्थिती आहे. आजची परिस्थीती काय? पुढे काय होणार?

उत्तर : पुढे काय होणार हे आम्हीदेखील सांगू शकत नाही. अजूनही पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लघंन करत आहे. पाकनेच हे ठरवावे त्यांना नेमके काय हवे आहे.

 

प्रश्न : पाकचे दावे खोटे कसे ठरवणार?

उत्तर : व्हिज्युअल्स (दृश्य स्वरुपातील पुरावे) आपल्याकडे आहेतच. पाकिस्तानकडे एकच लढाऊ विमान आहे. पाकिस्तानच्या सर्व विमानांची, त्यांच्या हालचालींची माहिती मिळविण्यास आपण सक्षम आहोत. इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आपल्याकडे आहे. पाकिस्तानचे F१६ हे विमान यात सामील होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिड २१ चे अवशेष सापडलेले नाहीत. F१६ वापरण्यात आल्याचे पाकिस्तान कबूल करत नाही.

 

प्रश्न : बालाकोट येथील एअर स्ट्राईकचे पुरावे कसे देणार?

उत्तर : पुरावे कधी आणि कसे सादर करायचे हे सर्वस्वी सरकारवर अवलंबून आहे. ऑपरेशन पाकिस्तानी मिड २१ मिराज,

 

प्रश्न : अभिनंदनला पाठवत आहेत, हे खरे आहे का?

उत्तर : अभिनंदन परत येत आहे याचा आम्हाला आनंद आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@