मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2019
Total Views |


 


सुबोध जयस्वाल यांना महासंचालक पद

 

मुंबई : राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सुबोध जयस्वाल यांची महासंचालकपदी वर्णी लागली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्याने जयस्वाल यांना बढती मिळाली आहे.

 

संजय बर्वे हे १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी राज्यगुप्त वार्ता विभागाचे प्रमुख पद भूषवले होते. तर, सुबोध जयस्वाल हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या कारकिर्द या महिनाअखेरीस पूर्ण होत आहे. तसेच, देशात तणावाचे वातावरण असताना महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त पदासारखी महत्त्वाची पदे रिक्त ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे ही पदे तत्काळ भरण्यात येणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@