भारतीय वायूसेनेचा पाकिस्तानला धसका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2019
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानातील जनता तणावाखाली असल्याचे चित्र आहे. एफ-१६ या विमानाला लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या नियंत्रण रेषेवर कुरापती सुरूच आहेत. मात्र, पाकिस्तानातील जनता वेगळ्याच तणावाखाली आहे.
 

 
 

भारतीय सैन्यदल यानंतर शांत बसणार नाही, ही भीती पाकिस्तानच्या मनात आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती आहे. संपूर्ण पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय विमानतळसेवा बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानाच्या हद्दीतून एकही आंतरराष्ट्रीय विमान जात नाही. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घेण्यात आलेल्या विमानांच्या नकाशानुसार पाकिस्तानच्या हद्दीतून जाणाऱ्या विमानांचा मार्ग वळवण्यात आला आहे.

 

 
 

बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर भारतीय वायुसेनेचा धसका पाकिस्तानने घेतला असून तेथील नागरिक ‘IAF’ म्हणजेच इंडियन एअर फोर्स हा शब्द सर्च करत आहे. पाकिस्तानमध्ये गुगलवर IAF हा शब्द ट्रेंडींगमध्ये आहे. यापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रुग्णालयांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सरकारकडून रुग्णालयांना एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

 
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@