मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : फ्रान्स, अमेरीका आणि इंग्लंड या देशांकडून मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर यात मसूदच्या जैश-ए-मोहम्मद संघटनेला ब्लॅकलिस्ट करण्याचीही मागणी करण्यात आली. त्याआधी पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी भारताकडून करण्यात येत होती.

 

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून भारताकडून करण्यात येत होती. पुलवामा येथे करण्यात आलेला दहशवादी हल्ला मसुदच्या जैश संघटनेने घडवून आणला होता. पाकिस्तानकडून त्यांना शह देण्याचे काम होत होते असा आरोप भारताकडून लावला गेला होता. मात्र, हे सर्व आरोप खोटे असल्याचा कांगावा पाकिस्तान करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडलेल्या प्रस्तावामुळे पाकचा खरा चेहरा आता जगासमोर आला असून हा भारताचा विजय असल्याचे सांगितले जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@