राणेंच्या स्वाभिमानीला मिळणार बादलीची साथ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2019
Total Views |


 


ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष 'बादली' हे चिन्ह घेऊन निवडणूक लढणार आहे. खुद्द नारायण राणे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, "आमचा पक्ष येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शक्ती लावून लढणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे आज आम्हाला निवडणूक लढण्यासाठी हक्काचे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा शुक्रवार दि. १ मार्च २०१९ रोजी करणार आहोत."

 

मुंबईकर कोकणवासीय मेळाव्याला नारायण राणे याची अधिकृत घोषणा करणार आहेत. बांद्रा पश्चिम येथील रंगशारदा येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@