मराठा आरक्षणानुसार नियुक्त्यांचे आदेश तत्काळ थांबवा; सामान्य प्रशासनाचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |


मुंबई : सामान्य प्रशासन विभागाने मराठा आरक्षणातून देण्यात येणाऱ्या नियुक्त्यांचे आदेश तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या विविध याचिकांचा हवाला देत सामान्य प्रशासनाने हा आदेश दिला आहे.

 

सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातील सर्व विभागांसाठी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या नियुक्तीचे आदेश तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या विभागाचे सचिव शिवाजी दोंड यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. यामुळे

 

मराठा समाजात नाराजी पसरण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकांमध्ये १७५ / २०१८ व इतर याचिकांचा समावेश आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात जोपर्यंत पुढील सुनावणी अथवा आदेश जारी केले जात नाहीत, तोपर्यंत कोणत्याही नवीन नियुक्त्या आणि त्यांचे आदेश देण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाची माहिती आणि अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्त आणि सर्व मागासवर्गीय महामंडळाच्या कार्यालयांना हे आदेश पाठवण्यात आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@