पाकिस्तानी शेअर बाजारात हाहाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |
 
 
 

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेद्वारे एफ १६ हे लढाऊ विमान पाडल्याच्या बातमीनंतर पाकिस्तानी शेअर बाजाराने नांगी टाकली. बुधवारी जेव्हा पाकिस्तानी लढाऊ विमान पडल्याचे वृत्त आले त्यानंतर पाकिस्ताचा कराची स्टॉक एक्सचेंज कोसळला. मंगळवारी भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी शेअर बाजारात किरकोळ घसरण झाली होती. बुधवारी विमान पाडल्याच्या वृत्तानंतर बाजार ४ टक्के कोसळला. काहीवेळाने तो सावरत ३७ हजार ३०० च्या स्तरावर बंद झाला.

 

मंगळवारच्या तुलनेत कराची स्टॉक एक्सचेंज सुमारे १५०० अंशांनी घसरत ३७ हजार ३३० च्या स्तरावर पोहोचला. पाकिस्तानी KSE १०० इंडेक्समध्ये एकूण ८५ टक्के कंपन्या नोंदणीकृत आहेत. सीमेवरील तणावामुळे पाकिस्तानी शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईमुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. यामुळे पाकिस्तानी गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

 

गुंतवणूकदारांनी पाकिस्तानातून पैसे काढण्याची सुरुवात केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आधीच नाजुक आर्थिक स्थितीत असलेल्या पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास भारताने सुरवात केली होती. भारताकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाही काढून टाकण्यात आला आहे. तसेच, आयातशुल्क दोनशे टक्क्यांनी वाढवल्याने पाकिस्तानची कोंडी केली आहे. सौदी अरेबिया आणि मलेशियातील गुंतवणूकदार काढता पाय घेण्याच्या मार्गावर आहेत.

 

दरम्यान पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने दहशतवादीविरोधी कारवाईला पाठींबा दिला आहे. चीनने दोन्ही राष्ट्रांना चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यास सांगितले आहे. तर रशिया आणि अमेरिकेकडून भारताला पाठींबा देण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदार पाकिस्तानमधून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@