इम्रान खानचे मोदींसमोर लोटांगण : चर्चेतून तोडगा काढण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |
  


नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सुड घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने खात्मा केलेल्या ३५० दहशतवाद्यांच्या हत्येचा पुळका पाकिस्तानला आला आहे. भारतीय सीमाभागात पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी बुधवारी केली. याला चोख प्रत्युत्तर देत दक्ष भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी विमान एफ १६ हे विमान पाडले.

 

भारताने या प्रकरणी चर्चा करावी असा कांगावा आता पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांनी चर्चाकरून तोडगा काढू अशी भूमिका पत्रकार परिषदेद्वारे घेतली आहे. आम्हाला शांतता हवी, असे म्हणत चर्चेसाठी आम्ही तयार असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

 
आतंकवादावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. भारताने आम्हला संधी द्यावी. युद्ध झाले तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. पुलवामा हल्ल्याच्या चौकशीसाठीही पाकिस्तान तयार आहे. दहशतवादाविरोधात चर्चेसाठी आम्ही आता तयार आहोत, असे इम्रान खान म्हणाले आहेत. दरम्यान या प्रकरणी भारताकडून प्रतिक्रिया आलेली नाही.  
 
 

बुधवारपासून दिल्ली आणि पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. श्रीनगर, लेह आणि जम्मू विमानतळ बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@