शेती, ग्रामविकास, सामाजिक न्यायाला चालना : खा. रावसाहेब पाटील दानवे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |


मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प शेती, सामाजिक न्याय, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा व ग्रामविकासाला चालना देणारा असून आपण त्याचे स्वागत करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे राज्याच्या विकासाला मिळालेली गती यामुळे कायम राहील, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी व्यक्त केली.

 

खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी हजार ४९८ कोटींचा निधी, कृषी पंपांना विदयुत जोडणी देण्यासाठी 00 कोटींचा निधी, सहकारी संस्थांच्या कृषी वकृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी 00 कोटींच्या अनुदानाची तरतूद, सर्वसामान्य लोकांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एसटीच्या ९६ बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी २७0 कोटी रुपये अशी अंतरिम अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

 

त्यांनी सांगितले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीयोजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरण्याकरीता उत्पन्नाची मर्यादा लाख रुपये करण्यात आली आहे तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल 00 कोटींनी वाढविण्यात येणार आहे. तसेचओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठीच्या विविध योजनांसाठी हजार ८९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, वीजपुरवठा, मेट्रो, घरबांधणी अशा विविध क्षेत्रासाठी या अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@