मराठीत नव्या दीड हजार शब्दांचा समावेश!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : मराठी भाषेमध्ये दीड हजार नव्या शब्दांची भर पडणार आहे. त्यामुळे मराठी भाषेचे वैभव आणखी समृद्ध होणार आहे. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने यापूर्वी प्रकाशित केलेल्या २० खंडातील अद्द्यावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामाचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. विश्वकोश हा मुद्रित माध्यमामध्ये प्रकाशित न करण्याचा निर्णय मराठी विश्वकोश मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता पुढील काळात विश्वकोश, विश्वकोशातील नव्या नोंदी आणि कुमार विश्वाचे तीन खंड हे www.marathivishwakosh.org या संकेतस्थळावर पाहता येतील.
 

मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी ही माहिती दिली. मराठी विश्वकोशातील जुन्या नोदींच्या अद्द्यावतीकरणाचे काम विश्वकोश मंडळ करत आहे. हे काम यापुढेदेखील सातत्याने सुरु राहील. गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ४७ विषयनिहाय मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी विज्ञान परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थांचा प्रामुख्याने समावेश आहे. विज्ञान, साहित्य, अभिजात भाषा, अर्थशास्त्र, लोकसाहित्य, लोकसंस्कृती, वैज्ञानिक चरित्रे, विज्ञान संस्था, सामरिक शास्त्र, राष्ट्रीय सुरक्षा आणि संगीत अशा विविध विषयांमधील नोंदी या पहिल्या टप्प्यामध्ये आहेत. ज्ञानमंडळाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये दीड हजार नव्या शब्दांची नोंद करण्यात आली असून लवकरच हे शब्द संकेतस्थळावर उपलब्ध होतील. हे काम सातत्याने सुरु राहावे. यासाठी ज्ञानमंडळाच्या कार्यकालाला २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती दिलीप करंबेळकर यांनी दिली.

 

मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर भारतीय धर्म आणि तत्वज्ञान, कायदा प्राचीन ऐतिहासिक काळ, विश्व साहित्य, विद्युत अभियांत्रिकी, धातुविज्ञान, खाणविज्ञान आणि संगीत विविध क्षेत्रातील तज्ञ यासंबंधीत विषयांची माहिती लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेत पोहोचविण्याचे काम मराठी विश्वकोश मंडळ करत आहे. डॉ. अरुणाताई ढेरे, डॉ.बाळ फोंडके, डॉ. नीरज हातेकर, डॉ. गौरी माहुलीकर हे दिग्गज विषयपालक म्हणून हे काम पाहत आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालायातील प्राध्यापक, पीएचडीचे विद्यार्थी मराठी विश्वकोशातील नोंदीसाठी मदत करत आहेत. असे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी सांगितले.

 

मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या नोंदी व्हिडिओ स्वरुपात पाहता येणार आहेत. त्यामुळे विश्वकोश समजून घेण्यासाठी अधिकाधिक मदत होईल. खडी गंमत, डहाका, खंडोबाचे जागरण, ज्येष्ठ अर्थतज्ञ अमर्त्य सेन, गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्या नोंदीमध्ये त्या संदर्भातील व्हिडिओ दिसतील. इतर ज्ञान मंडळातील नोदींनादेखील अशाच प्रकारच्या ऑडिओ-व्हिडिओची जोड देता येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@