विधिमंडळात आज सादर होणार अंतरिम अर्थसंकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |


 


मुंबई - राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज (बुधवारी) विधिमंडळात दुपारी २ वाजता सादर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. 

 

अर्थसंकल्प शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून मांडण्यात येणार असून राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी म्हटले आहे. सर्वसामान्य नागरिक, वंचित घटक समोर ठेवून अर्थसंकल्प तयार केला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे यात केवळ पुढील ४ महिन्यांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर होणाऱ्या मुख्य अर्थसंकल्पाची दिशा असेल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. आज ४ महिन्यांच्या खर्चाचे लेखानुदान सादर केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

 

राज्याच्या प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या आर्थिक तरतूदी या अर्थसंकल्पामध्ये असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. युतीतील मुख्य घटक पक्ष शिवसेनेच्या मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. मुंबईमध्ये ५०० स्केअर फुटच्या फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट देणे आम्ही मान्य केले आहे. त्यानुसार हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@