दुबई-पाकिस्तान विमानसेवा बंद, देशातील विमानवाहतूकींचे मार्ग बदलले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |

 

 
 
 

देशातील ६ विमानतळे पुढील ३ महिन्यांसाठी बंद

 

दुबई : पाकिस्तानवरून दुबईला येणारी आणि दुबईवरून पाकिस्तानला जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या विमानांवर प्रतिहल्ला केला आणि ही विमाने परतवून लावली. पाकिस्तानच्या विमानांनी काही ठिकाणी बॉम्ब टाकल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर दुबई विमानतळावर पाकिस्तानी विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.

 

पुढील सुचना येत नाही तोपर्यंत दुबईहून एकही विमान पाकिस्तानला जाणार नाही, तसेच पाकिस्तानवरूनही एकही विमान दुबईला जाणार नाही. असा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबई, दिल्लीसह देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील ६ विमानतळे पुढील ३ महिन्यासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. २७ मे पर्यंत या विमानतळांवरील विमानवाहतूक बंद राहील अशी माहिती देण्यात आली आहे. अमृतसर, श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगढ, देहराडून या ६ विमानतळांवरून एकही उड्डाण होणार नाही. असा निर्णय तातडीने घेण्यात आला. जैसलमेर विमानतळाचादेखील यामध्ये समावेश करण्यात येईल. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

एअर इंडियासह देशातील इतर विमान कंपन्यांनी देखील आपल्या विमान वाहतूक मार्गात बदल केला आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळाच्या स्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विमानतळ बंद ठेवण्यात आल्याची तारीख निश्चित करण्यात आलेली असली तरी त्यात बदल केला जाऊ शकतो. अशी माहिती मिळाली आहे. विमान कंपन्या ग्राहकांच्या विमान तिकीटाचे पैसे परत करणार आहेत. तसेच काही काळानंतर विमान तिकीटांच्या रिबुकिंगची सुविधादेखील विमान कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, पाकिस्तानने तात्पुरत्या कालावधीसाठी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. परिणामी, आंतरराष्ट्रीय विमानांना देशाबाहेरून फिरून जावे लागणार आहे. पाकिस्तान मार्गे जाणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय विमानांचे वाहतूकमार्ग वळविण्यात आले असून ही विमाने मुंबईहून जातील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@