सौगंध मुझे इस देश के मीट्टी, ये देश नही झुकने दुंगा : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2019
Total Views |
 


भारतीय वायु सैन्याच्या धाडसाला नमन : मोदी


चुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीरभूमी राजस्थानच्या चुरू येथून प्रचार रॅलीला सुरुवात केली आहे. भारतीय वायुसेनेच्या एअर सर्जिकल स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली. भारतीय जनता पक्षाला देशाशिवाय दुसरे काहीच मोठे नाही. याच भावनेने आम्ही देशसेवा करत आहोत. देशवासींचा विश्वास आमच्या सोबत आहे. देश सुरक्षित हातांमध्ये असल्याची भावना संपूर्ण देशवासीयांमध्ये आहे आणि मला माझ्या देशाच्या मातीची शपथ आहे.

 

देशाची मान कधी झुकू देणार नाही, असे भावोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. भारतीय वायू सेनेकडून मंगळवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केला. यात दहशतवाद्यांच्या तळांवर १ हजार किलोचा बॉम्ब हल्ला केला. पुलवामा हल्ल्यानंतर बाराव्या दिवशी भारतीय सेनेने ही कारवाई केली होती. यात युसूफ अजहर हा मसूद अजहरचा नातेवाईक मारला गेला. दुपारी वायुसेने एकूण ३५० अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांच्या सन्मानाबद्दल आपल्या भाषणात उल्लेख करताना म्हणाले कि, सैनिकांचा सन्मान करण्यास मिळणे हे माझे भाग्य आहे. भारताच्या प्रधान सेवकाकडून भारतीय सैन्य आणि जनतेला नमन आहे.

 

राजस्थान कॉंग्रेसवर हल्लाबोल

चुरूमधल्या शेतकऱ्यांची यादी राजस्थान सरकारने केंद्राकडे दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात पहिला हप्ता पोहोचू शकलेला नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@