एअर स्ट्राईकनंतर गुंतवणूकदार सोडणार ‘पाक’ची साथ ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकमधून सावरत नसलेल्या पाकिस्तानवर आता आर्थिक संकटांचे ढग गडद झाले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काढून घेतलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाकाढून घेत आयातशुल्क दोनशे टक्के केले होते. या कारणाने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आता मलेशिया आणि सौदी अरबकडून दणका मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही देश पाकिस्तानमधील गुंतवणूक टप्प्याटप्प्याने कमी करतील, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय अर्थकारणात व्यक्त केली जात आहे.

 

मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्यानंतर आर्थिक खच्चीकरण झालेल्या पाकिस्तानला यावर तोडगा काढणे जमलेले नाही. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री हम्माद अजहर यांनी या प्रकरणी सरकार विचार करत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान पाक व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. भारताकडून ना निर्यात केली जात आहे ना आयात यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. इस्लामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अहमद हसन मोघुल म्हणाले कि, यावर केवळ भारतच तोडगा काढू शकतो. यामुळे दक्षिण आशियातील गुंतवणूकीवर याचा परिणाम होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@