LIVE : बदला घेतलाच! 'पीओके'तील ३०० दहशतवाद्यांचा खात्मा, कच्छ सीमेवरील ड्रोनही उद्धस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. जैश-ऐ-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पीओकेमधील अड्डे उद्धवस्त केले आहेत. भारताच्या वायुदलाने ही कारवाई केली आहे. भारताच्या मिराज २००० या लढाऊ विमानाने पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हे दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत केले. पाकिस्ताननेदेखील भारताच्या लढाऊ विमानांनी पीओकेचे उल्लंघन केल्याचे काबुल केले आहे. कच्छ सीमेवर असलेले ड्रोन भारतीय लष्कराने उद्धस्त मात्र, याबाबत भारतीय वायुसेना लवकरच या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊ शकते. 

 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे मिराज २००० या लढाऊ विमानाने हे हल्ले केली आहेत. यामध्ये १२ विमानांचा समावेश होता. या विमानाने पाकिस्तानच्या सीमेत दीडशे किलोमीटर जाऊन बालाकोट व चिकोटी या दोन ठिकाणी हजार किलोग्रामचे बॉम्ब हल्ले केले आहेत. यात जवळपास तिनशे अतिरेकी मारले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करून भारताने पीओकचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

 

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. यानंतर देशभरात मोठी संतापाची लाट दिसून आली होती. शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी देशवासियांकडून करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला पूर्ण स्वतंत्र दिल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्याने ये नया हिंदुस्थान असल्याचे दाखवून दिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@