महागठबंधनला मायावतींचा ‘महाझटका’ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |

 
 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीपूर्वी महाआघाडीला मोठा धक्का दिला आहे. बसप बिहारमधून स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकांनंतर कॉंग्रेससह महाआघाडीमध्ये असलेले विविध पक्ष लोकसभेपूर्वीच विखुरल्याचे चित्र दिसत आहे.

 

बसपने बिहारमधून लोकसभेच्या सर्व ४० जागांवर आपल्या जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मायावतींनी पक्षातील नेत्यांची बैठक झाली आहे. बसप प्रदेशाध्यक्ष भरत बिंद यांनी सोमवारी लोकसभा निवडणूकांसंदर्भात कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार, सर्व ४० जागांवर लढण्याची तयारीचे आदेश दिले आहेत.

 

कार्यकर्त्यांना राज्यभर सक्रीय राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी नवी दिल्ली येथे २८ फ्रेब्रुवारी रोजी एक बैठक होणार आहे. मायावतींच्या या निर्णयामुळे एकवटलेल्या महाआघाडीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

उत्तरप्रदेशातही स्थिती चिंताजनक !

बिहारमध्ये स्वबळाची घोषणा करणाऱ्या बसपने आता उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासह जाण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या एकूण ८० जागांवर सपा ३७ व बसपा ३८ जागा लढवणार आहेत. अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवार न उतरवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. २०१४ लोकसभा निवडणूकीत बसपला एकही जागा राखता आली नव्हती. भाजप आणि इतर पक्षांना एकूण ७३ जागा मिळाल्या होत्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@