म.पों.चे पहिले मराठी साहित्य संमेलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : मुंबईमध्ये पहिल्या महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलनला सुरुवात झाली. राज्यभरातील १७० पोलीस साहित्यिकांचे साहित्य लेख, पुस्तके, काव्यसंग्रह या साहित्य संमेलनात मांडले आहेत. सकाळी पोलीस साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडी निघाली. या दिंडीमध्ये राज्यभरातील पोलीस पारंपरिक पोशाखात सामील झालेले होते. साहित्य संमेलनाला महाराष्ट्र पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. सम्मेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

 

राज्यात शांतता राखावी म्हणून सदैव तत्पर असलेल्या महाराष्ट्र पोलिसांचे साहित्य लोकांसमोर यावे. तसेच, कामाच्या व्यापामुळे नित्यपणे ताणतणावाला सामोरे जावे लागते. त्यांच्यातील साहित्याविषयाच्या जाणीवा समाजासमोर मांडल्या पाहिजेत. या हेतूने पोलिसांचे साहित्य संमलेन घ्यावे, अशी संकल्पना राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी मंडळी होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक दिवस चालणाऱ्या या संमेलनात १७० पोलीस साहित्यिक सहभागी होतील. त्यामध्ये कॉन्स्टेबलपासून ते अप्पर महासंचालक दर्जापर्यतचे अधिकारी आपले साहित्य, विचार मांडणार आहेत.

 

"पोलिसांमध्येही साहित्यिक, कवी, लेखक लपलेला असतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास दक्ष असणाऱ्या पोलिसांमधील हे साहित्य गुण समाजासमोर यावेत, यासाठी हे संमेलन होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच ‘दक्ष’ महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन होत आहे. पोलिसांमधील साहित्यिकाला दाद देण्यासाठी त्यांच्या गुणांना वाखाणण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे." असे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@