यंदा दुष्काळ नाही, ‘स्कायमेट’चा अंदाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |


 
 
 
 
मुंबई : यंदाचा पावसाळा हा देशातील शेतकऱ्यांना सुखावणारा ठरणार आहे. यावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. असा अंदाज हवामानाची माहिती देणाऱ्या ‘स्कायमेट’या खासगी संस्थेने वर्तवला आहे. यावर्षी जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर यादरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक टक्क्यांनी वर्तविण्यात आली आहे.
 
 
 
 

गेल्या वर्षी जुलैपासून सप्टेंबरपर्यंत मान्सूनच्या शेवटी पावसाची सरासरी ९१ टक्के होती. हवामान विभागाने पावसाच्या सरासरीचा अंदाज ९७ टक्के वर्तवला होता. सलग पाचव्या वर्षी हवामान विभागाकडून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा दुष्काळाची शक्यता खूप कमी असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला असून यावर्षी पाऊस सामान्य असेल असे त्यांनी म्हटले आहे. ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेकडून पहिला सविस्तर हवामान अंदाज १ एप्रिल रोजी प्रसिद्ध केला जाईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@