विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार, दि. २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून शनिवार, दि. २ मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधीमंडळाचे हे शेवटचे अधिवेशन आहे. यानंतर विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होईल व त्यानंतर विद्यमान विधानसभा विसर्जित होऊन विधानसभेची निवडणूक होईल. त्यामुळे या अधिवेशनाला राजकीयदृष्ट्याही महत्व प्राप्त झाले आहे.

 

सोमवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होणार असून यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अभिभाषण होणार आहे. त्यानंतर अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचे प्रस्ताव, अध्यादेश सभागृहापुढे ठेवणे, २०१८-१९ च्या पुरवणी मागण्या सादर करणे, शासकीय विधेयके व शोक प्रस्ताव आदी कामकाज होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@