विरोधकांच्या पत्रकार परिषदेला घटकपक्षांची दांडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2019
Total Views |



मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परंपरेप्रमाणे विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, यावेळी घटक पक्षांनीच काँग्रेस-राष्ट्रवादीला टांग दिल्याने विरोधी पक्षांनी राणाभीमदेवी थाटात केलेले दावे फुसका बारच ठरले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे सोडले तर एकाही घटक पक्षाच्या नेत्याने विरोधी पक्षांच्या बैठकीला हजेरी लावली नाही.

 

विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांकडून पत्रकार परिषद घेण्यात येते. यावेळी सर्व विरोधी घटक पक्षांची उपस्थिती असते. पण रविवारी घेण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस नेत्यांच्या जोडीला केवळ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती होती. विरोधकांच्या आघाडीत नेहमी सहभागी असणारे बहुजन विकास आघाडी, लोकभारती पक्ष, जनता दल, समाजवादी पक्ष, शेकाप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या घटकपक्षांचे कुणीही प्रतिनिधी पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते.

 

याविषयी माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अन्य पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत असे सांगून वेळ मारून नेली. प्रत्यक्षात पत्रकारांना दिलेल्या प्रेसनोटमध्ये वरीलपैकी एकाही पक्षाच्या नेत्यांची स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे विरोधकांच्या या आघाडीला घटक पक्षांचा पाठिंबा आहे का, याविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@