‘हैशटैग मैं मोदी के साथ’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनतेला विशेषतः तरुणाईला भाजपाबरोबर जोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी ‘हैशटैग मैं मोदी के साथ’ (#MaiModiKeSaath) ही मोहीम (कैंपेन) सुरू केली आहे.

 

‘जो देश के साथ, वो मोदी के साथ’ आणि ‘संकल्प हमारा, मोदी दोबाराया दोन घोषणा याआधी मोहित भारतीय यांनी दिल्या होत्या त्या सोशल मीडिया वर लोकप्रिय झाल्या आहेत. हैशटैग मैं मोदी के साथया मोहिमेला मुंबईत व्यापक रूप दिले जाणार आहे. मुंबई शहरातील लोकांपर्यंत ही मोहीम पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती मोहित भारतीय यांनी दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेल्या लोकप्रिय योजना विशेषतः युवकांसाठी राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती या माध्यमातून जनतेला दिली जाणार आहे. तसेच त्याचा लाभ कसा घ्यावा आदींचे मार्गदर्शन केले जाणार आहे, असे मोहित भारतीय यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लाखो तरुण स्टार्टअप इंडिया सारख्या योजनेतून स्वावलंबी झाले आहेत त्याचा अभिमान वाटतो, असे मोहित भारतीय म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@