देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
भारतीय सैन्याची परंपरा आहे की- सैन्याचे अधिकारी आपल्या सैनिकांचे नेतृत्व दहशतवादीविरोधी अभियानांमध्ये सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच आपल्याला यश नक्कीच मिळते. परंतु, यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना जखमी व्हावे लागते व प्राणाचे बलिदान पण द्यावे लागते.
 

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे सुरू असलेली चकमक तब्बल १८ तासांनतर संपली. यात एका मेजरसह चार जवान हुतात्मा झाले आहेत. मात्र, तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. मेजर डी. एस. ढोंढियाल, शिपाई सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंह ही त्या शूरवीरांची नावे आहेत. शिपाई गुलजार मोहम्मद हे जखमी झाले आहेत. या चकमकीत जम्मू-काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक, सैन्याचे ब्रिगेडियर यांच्यासह अनेक अधिकारी व सैनिक जखमी झाले आहेत. ब्रिगेडियरना पोटात गोळी लागली. याच एन्काऊंटरमध्ये एक कॅप्टन आणि लेफ्टनंट कर्नल यांनासुद्धा गोळी लागून ते जखमी झाले आहेत. सर्वांना लष्कराच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. मीडियाने त्यांची नावे शोधण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. ब्रिगेडियर हरबीर सिंग, लेफ्टनंट कर्नल राहुल गुप्ता, कॅप्टन सौरभ पटणी, मेजर विनायक आणि अनेक शूर सैनिक गंभीररीत्या जखमी झाले. त्यांची नावे देशाला कळणे गरजेचे आहे. आशा करूया सर्व लवकरच बरे होतील. दहशतवाद्यांना अमाप प्रसिद्धी दिली गेली, हे थांबले पाहिजे. भारतीय सैन्याची परंपरा आहे की, सैन्याचे अधिकारी आपल्या सैनिकांचे नेतृत्व दहशतवादीविरोधी अभियानांमध्ये सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच आपल्याला यश नक्कीच मिळते. परंतु, यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना जखमी व्हावे लागते व प्राणाचे बलिदान पण द्यावे लागते.

 

मेजर चित्रेश यांनी देशसेवेला दिलेले प्राधान्य

 

शनिवारी नियंत्रण रेषेजवळ मेजर चित्रेश सिंह बिश्त हे हुतात्मा झाले. राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ आयडी बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन त्यात त्यांना वीरमरण आले. मेजर चित्रेश यांचा येत्या ७ मार्च रोजी विवाह होणार होता. इकडे वडील त्यांच्या लग्नाच्या पत्रिका वाटत होते आणि तिकडे सीमेवर त्यांना वीरमरण आले. विवाहाच्या पूर्वतयारीसाठी रजा घेण्याचा वडिलांचा आग्रह असतानाही त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले होतेपुलवामाचा हल्ला झाल्यापासून मीडिया, देशप्रेमी नागरिक अनेक विषयांवर चर्चा करत आहेत. सरकारने काय करावे? सैन्याने काय करावे? सीआरपीएफने काय चुका केल्या वगैरे वगैरे. आता कोण काय म्हणाले, त्यापेक्षा आपण काय केले पाहिजे, हे देशाच्या दृष्टीने जास्त हिताचे आहे. त्यासाठी देशवासीयांना आता जागे होण्याची वेळ आली आहे. सैन्याने नेमकी कोणती कारवाई करावी, हा टीव्ही वा मीडियामध्ये चर्चेचाविषय नाही. नेमकी कारवाई करण्याकरिता सैन्य सक्षम आहे.

 

राजकीय पक्षांनी-सरकारने काय करावे?

 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील हल्ल्यानंतर आपल्या देशाने पाकिस्तानला दिलेला सर्वाधिक पसंतीचा राष्ट्रकाल मागे घेतल्याचे जाहीर केले. राजकीय पक्षांनी काय करावे, हा एक महत्त्वाचा विषय आहे. आमचे राजकीय नेते त्याचे राजकारण करत आहेत. त्यांनी व्होट बँकेसाठी काही लोकांना जवळ केले आहे. या बोटचेप्या भूमिकेमुळे आमच्याकडे दहशतवाद फोफावत आहे. त्याबद्दल पुढच्या लेखात.

 

प्रतीकात्मक पुतळे जाळून, बंद पाळून, मेणबत्त्या लावून दहशतवाद थांबणार नाही

 

सर्वात प्रथम हुल्लडबाजी करून देशाची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करू नये. सामान्य नागरिक सैन्याच्या मागे उभा राहून दहशतवादाविरोधात नेमकी काय भूमिका निभावू शकतोदहशतवादी आक्रमणानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरात पाकिस्तान आणि दहशतवादाचे प्रतीकात्मक पुतळे जाळणे, बंद पाळणे, मेणबत्त्या लावून निषेध व्यक्त करणे आदी पाहायला मिळत आहेत. या आधी उरी, पठाणकोट, मुंबई आणि त्याआधी संसदेवरील आक्रमण यावेळीसुद्धा हेच चित्र पाहायला मिळाले. यामुळे दहशतवाद थांबला नाही व आता व्यक्त केलेल्या देशभक्तीमुळे पण तो थांबणार नाही. त्याकरिता आपल्याला अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतील. पारंपरिक युद्धाची तयारी करावी लागेल. त्यात सरकारवर जास्त दबाव आणून घाईघाईने काहीतरी करण्यास भाग पाडणे उचित नाही. आज आपण जर पाकिस्तानशी थेट युद्ध पुकारायचे ठरवलेच, तर आपण किती हानी सहन करू शकतो याचा विचार अगोदर केला पाहिजे. याकरिता जर सैन्याचे बजेट वाढवण्यासाठी जर काश्मीर/पुलवामा कर पेट्रोल किंमतीवर लावला, तर त्याकरिता आपण तयार आहोत का? केवळ श्रद्धांजली न वाहता राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी देशातील सर्वांनी गट-तट विसरून एकत्र आले पाहिजे. रडण्यापेक्षा लढण्याची तयारी केली पाहिजे. तरच अशा हल्ल्यांना आळा बसेल.

 

सामान्य नागरिकांनी सैनिक गुप्तहेर व्हावे

 

प्रत्येक नागरिकाने आपापल्या भागांमध्ये, आपापल्या संस्थांमध्ये एक सैनिक म्हणून, एक गुप्तहेर म्हणून कान आणि डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे. कान आणि डोळे उघडे ठेवा, आपला भाग सुरक्षित ठेवा. आज ७० टक्के भारतीय हे सोशल मीडियावर आहेत. कान आणि डोळे सोशल मीडियावरदेखील उघडे ठेवा. सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट बघितली, तर लगेच त्याची लिंक सायबर पोलिसांकडे पाठवा. जेणेकरून त्यावर कारवाई करणे त्यांना सोपे जाईल. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची, मानसिक मदत जास्त, आम्ही हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या पाठीशी आहोत, हा विश्वास द्या. आर्थिक मदतीसाठी सैन्याचे अनेक अकाऊंट्स उपलब्ध आहेत. या माध्यमातूनही आपण सैनिकांना मदत करू शकतो. अजूनसुद्धा काही राजकीय नेते, वाट चुकलेले विचारवंत, तज्ज्ञ देशविरोधी वक्तव्ये करून सैन्याचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. काही पाकधार्जिणे फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि अनेक याचे राजकारणही करताना दिसत आहेत. नेत्यांनी देशाच्या बाजूने राहण्याची बुद्धी मिळू दे. उद्याही कोणी अहिंसेचे पुजारी, कोणी मानवाधिकारी आपापले मुद्दे मांडायला आसुसलेले असतीलच. सगळे पक्ष एकदिलानं सरकारच्या बाजूने उभे ठाकल्याचे दाखवतील, पण प्रत्यक्षात अनेक नतद्रष्टे नेते त्यात खोड्या काढतील.

 

सीमेपलीकडच्या शत्रूपेक्षा अधिक शत्रू सीमेच्या आत

 

कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावीअनेक राजकारणी समाजामधील वेगवेगळ्या घटकांना तुमच्यावर अन्याय होतो आहे, हे सांगून ऊठसूट हिंसक आंदोलने करण्यास भाग पाडतात. यामध्ये सामील होऊ नका. कारण, हिंसक आंदोलनामध्ये नुकसान हे आपल्या देशाचे होते. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात वेगवेगळ्या आंदोलनात ४० टक्के एसटी गाड्या जाळण्यात आल्या आहेत. हे बरोबर आहे का? आपण देशासाठी एवढे तरी, करू की पेट्रोलचा भाव वाढवावा लागला, सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी कर वाढवले गेले तरी तक्रार होऊ नये.

 

आपण भारतीय केवळ एक दिवस प्रतीकात्मक देशभक्तीचे प्रदर्शन करून उरलेले दिवस मात्र त्याच पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट सामने आणि पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट पाहण्यात घालवतो. आपली एक दिवसाची राष्ट्रभक्ती जागृत व्हायला सैनिकांना हुतात्मा व्हावे लागते, हे चित्र दुर्दैवी आहे. देशाची अखंडता आणि सुरक्षिततेला बाधक असणारे आतले शत्रू तसेच पाकिस्तान आणि सैनिकांवर दगडफेक करणारे इत्यादींच्या विरुद्ध निर्णायक कृती करण्यासाठी आपण सरकारला का भाग पाडत नाही? त्यासाठी आपले पद, पक्ष बाजूला करून सरकारला आवश्यक तो पाठिंबादेखील द्यायला हवा. एक दिवसाची मर्यादित राष्ट्रभक्ती नव्हे, आता राष्ट्रहिताच्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रतिदिन राष्ट्रभक्ती जोपासायला हवी!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@