बीसीसीआयचा निर्णय आम्हाला मान्य : कोहली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सामान्यांबद्दल प्रथमच भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपले मत मांडले आहे. "बीसीसीआय जो निर्णय घेईल, आम्ही त्यासोबत आम्ही राहू आणि तो आम्हाला मान्य असेल." असे स्पष्ट विधान विराट कोहलीने पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. रविवारपासून होणाऱ्या ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या मालिकेपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

 

विराट कोहली म्‍हणाला की, "पुलवामा दहशतवादी हल्‍ला दु:खद आहे. या हल्‍ल्‍यात शहीद जवानांच्‍या कुटुंबाच्‍या दु:खात मी आणि संपूर्ण भारतीय संघ सोबत आहे. पाकिस्‍तानशी वर्ल्ड कपचा सामना खेळण्‍यासंबंधी देशातील जनता, सरकार आणि बीसीसीआय जो निर्णय घेईल तो भारतीय संघास मंजूर असेल."

 

याआधीही काही क्रिकेटपटूंनी भारत-पाकिस्तानच्या विश्वकरंडकातील सामन्याबद्दल आपली मते जाहिर केली आहेत. हरभजन सिंह आणि सौरव गांगुली यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तर, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळावे, असे मत मांडले आहे. बीसीसीआय, सीओए कमिटी, रवि शास्त्री आणि विराट कोहली यांनी सरकार निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असे मत मांडले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@