मतदार यादीत तुमचं नाव आहे का? नसेल तर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2019
Total Views |


 

मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाची पुढील दोन दिवस विशेष मोहीम


मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मतदार नोंदणीसाठी शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदवता यावे यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

 

दि. १ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने ही दोन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत.

 

यासोबतच मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही मुख्य निवडणूक‍ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@