मुंबईत हायअलर्ट : रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2019
Total Views |

 

 
 
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या लाईफलाइनवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासह संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, असे आदेश रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाला देण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी पुढच्या तीन महिन्यांत मुंबई रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. मुंबई रेल्वे स्थानकांनाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
 

गुरुवारी तत्पूर्वी मुंबईजवळच्याच कर्जत-आपटा एसटीमध्ये आयईडी बॉम्ब सापडला होता. बुधवारी रात्री आपटा एसटी डेपोत आली असता, कंडक्टरला बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. ही वस्तू आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री हा बॉम्ब निकामी करण्यात आला. दरम्यान या पार्श्वभूमीवर रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला. लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कर्जतहून आलेली एसटी क्रमांक एम एच १४, बीटी १५९६ आपटा बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्याने माहिती देताच रसायनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्बशोधक पथकाला या घटनेची माहिती दिली.

 

मुंबईतील लोकलसह सर्व स्थानकांवर सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास संबंधित पोलीस यंत्रणा किंवा रेल्वे पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@