हास्यास्पद ; बेस्ट टॉयलेट पेपर आणि पाकिस्तानचा झेंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : गुगलवर बेस्ट टॉयलेट पेपर इन वर्ल्डअसं सर्च केल्यानंतर पाकिस्तानच्या झेंड्याचा फोटो येतो. ट्विटरवरही सध्या #besttoiletpaperintheworld हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. नेटीझन्स गुगलवरील रिझल्ट ट्विटवर पोस्ट करत आहेत. यापूर्वी गुगलवर भिखारी सर्च केल्यास पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो येत होता. काही तज्ञांच्या मते गुरूवारी पुलवामा येथे झालेल्या हल्यात सीआरपीएफचे ४२ जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. एखाद्या व्यक्तीने गुगल अल्गोरिदम किंवा गूगल बॉम्बिंगशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

आपण जेव्हा या सर्च इंजिनमध्ये एखादा शब्द टाईप करतो त्याच वेळेस ही संगणक प्रणाली किमान १०० कोटी किंवा कमाल कितीही अशा शब्दांच्या समूहांना २०० निकषांची चाळणी लावतो. हे दोनशे घटक असतात संदर्भ, लोकप्रियता, कालसापेक्षता, सदर शब्द आधी कोणाकोणाच्या संदर्भात वापरला गेला आहे... वगैरे अनेक. त्यामधून चाळून मग काही पर्याय समोर येतात. ते जवळपास अचूक असतात. कारण इतके शब्द आणि त्यांच्या छाननीचे निकष याच्यापेक्षा वेगळे काहीच नसते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@