कुलभुषण जाधव प्रकरणी पाकिस्तानने वापरले अपशब्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
द हेग : आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभुषण जाधव प्रकरणी खटल्यावर सुनावणी सुरु आहे. सुनावणी दरम्यान पाकिस्तानी वकीलांनी अपशब्द वापरले. भारताचे वकील हरिश साळवे यांनी याप्रकरणी आक्षेप घेत पाकिस्तानला चांगलेच खडसावले. न्यायालयात असे अपशब्द वापरण्यास आळा घालावा, त्यासाठी लक्ष्मणरेषा आखावी. अशी विनंती हरिश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला केली.
 

आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभुषण जाधव प्रकरणी खटल्याच्या सुनावणीचा बुधवारी तिसरा दिवस होता. भारताकडून पाकिस्तानच्या मुद्द्यांवर प्रतिवाद करण्यात आला. सुनावणी दरम्यान, पाकिस्तानचे वकील खावर कुरेशी यांनी अपशब्द वापरले. भारताचे वकील हरिश साळवे यांनी ही गोष्ट आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दृष्टीस आणून दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने याकडे लक्ष देऊन भाषेच्या अशा वापरासंबंधीत लक्ष्मणरेषा आखावी. असे हरिस साळवे यांनी न्यायालयाला सांगितले. पाकिस्तानी वकील खावर कुरेशा यांनी पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर मांडताना नॉन्सेन्स (मूर्ख),शेमलेस (निर्लज्ज), डिग्रेसफुल (लज्जास्पद) अशा अपशब्दांचा वापर केला. भारतीय वकील हरिश साळवे यांनी यावर आक्षेप घेतला.

 

दरम्यान, नवीन हंगामी न्यायाधीशांची निवड करण्यासाठी कुलभुषण जाधव प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात यावी. अशी विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभुषण जाधव प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. बुधवारी याप्रकरणी अंतिम युक्तिवाद करण्यासाठी भारताला ९० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. गुरुवारी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय याप्रकरणीचा निर्णय एप्रिल किंवा मे महिन्यात देणार असल्याची अपेक्षा आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@