एसटीमध्ये आढळला बॉम्ब; आपटा वस्ती येथील घटना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |


 
 
 
रायगड : कर्जत आपटा वस्ती एसटी बसमध्ये बुधवारी रात्री बॉम्ब सापडल्याने खळबळ माजली होती. हा बॉम्ब निकामी करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. ही एसटी बस आपटा गाव येथे मुक्कामी होती. बुधवारी रात्री १० : ३० च्या सुमारास ही घटना घडली. या एसटी बसमध्ये एक बेवारस पिशवी सापडली. ही पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. एसटी बसच्या ड्रायव्हर आणि कंडाक्टरने तातडीने याची माहिती तेथील स्थानिक पोलीस स्टेशनला दिली. स्थानिक पोलीसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले.
 
 

 
 

वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पोलीस आणि बॉम्ब शोधक नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा बॉम्ब निकामी करण्यात पोलीसांना यश आले. याप्रकरणी पुढील तपास सुरु असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या एसटी बसमधील एसटी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. या घटनेमुळे आपटा गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवा पसरवू नयेत. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

स्थानिक पोलीसांनी याप्रकरणी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. वरिष्ठ पोलीस अधिकारी, क्राईम ब्रांच घटनास्थळी आहेत. ती एसटी बसही अजून घटनास्थळीच ठेवण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 

कुंदन गावडे, रायगड पोलीस जनसंपर्क अधिकारी
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@