गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय : जवानांचा प्रवास आता विमानातून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |
 
 
 

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जवानांच्या सुरक्षिततेचा विचार करत जम्मू-काश्मीरमध्ये तैनात निमलष्करी दलांसाठी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. निमलष्करी दलाच्या जवानांना दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, श्रीनगर-जम्मू व जम्मू-श्रीनगर या ठिकाणांवर जाण्यासाठी विमान प्रवास करता येणार आहे.

 

पुलवामा हल्ल्यानंतर जवानांचा प्रवास हवाई मार्गाने व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान या मागणीला केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरवा कंदील दाखवत जवानांच्या सुरक्षेसाठी आता विमानप्रवासाची मुभा दिली आहे.

 

या निर्णयानुसार, या भागात तैनात असलेल्या सुमारे ७ लाख ८० हजार जवानांचा प्रवास या भागातून होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होईल. दरम्यान, कर्तव्यावर असताना तसेच, सुट्टीवर जाताना वा पुन्हा रुजू होताना श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी ही सुविधा मिळणार आहे. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकारी यांचा सामावेश असणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@