विश्वचषकातून पाकला बाहेर काढण्याच्या तयारीत बीसीसीआय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरातून पाकिस्तानची कोंडी केल्यानंतर आता क्रिकेटच्या मैदानावरदेखील पाकिस्तानला घेरण्याचे संकेत दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि वेल्स येथे आयसीसी विश्वचषक २०१९मधून पाकिस्तान संघाला भाग घेऊन देऊ नये यासाठी बीसीसीआय आयसीसीच्या पत्र लिहणार असल्याचे समोर येत आहे.

 

इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान १६ जूनला एकमेकांसमोर उभे ठाकणार होते. मात्र हा सामना होणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. या सामन्यासंदर्भात सरकारच निर्णय घेईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी आधीच सांगितले आहे. मात्र, भारताने सामना खेळण्यास नकार दिला तर पाकिस्तान संघाला गुण मिळतील आणि भारतीय संघाला याचे नुकसान भोगावे लागेल. तसेच जर या दोघांची उपांत्य किंवा अंतिम सामन्यांमध्ये लढत झाली तर भारताचा पाकिस्तानशी न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान संघाला विजय मिळवून देऊ शकतो.

 

अधिकृतरीत्या बीसीसीआयने कोणतीही घोषणा केली नसली तरी पाकिस्तानविसरुद्ध त्यांनी कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने मुंबईतील आपल्या मुख्यालयातून पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित फोटो आणि स्मृती चिन्हं हटवली आहेत. याशिवाय राज्यातील अनेक क्रिकेट संघटनांनीही आपापल्या कार्यालयातून पाकिस्तानी क्रिकेटरशी संबंधित फोटो हटवले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@